सांगली – सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांच्या विरोधात काल रात्रीपासून त्यांचा जुना व्हिडिओ व्हायरल करून फेक न्युज पसरवण्याचा प्रयत्न झाला. त्यासंदर्भात अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी निवडणूक अधिकारी सांगली विधानसभा मतदारसंघ, सांगली यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
या तक्रारीनुसार निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले की काही मोबाईल नंबर, फेसबुक, युट्युब न्यूज यांच्यावरून खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यात आलेली आहे. या असल्या खोट्या न्यूज पसरवल्याने निवडणूक मार्गदर्शक तत्त्वांचे आणि कायद्याचे गंभीर उल्लंघन झाले आहे. यासंदर्भातील व्यक्ती आणि संस्थावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी. ज्या कोणी या अशा प्रकारची फेक न्यूज दिली त्यांचे वर्तन नैसर्गिक नसून लोकशाही प्रक्रियेस मारक आहे. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून या प्रकरणाचा निपटारा करावा. निवडणुकीची अखंडचा राखली जावी या प्रकार प्रकरणाशी असणाऱ्या संबंधित व्यक्ती आणि संस्थेवर कठोर ती कारवाई व्हावी. तसेच अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडेही तक्रार अर्ज दाखल केला आहे.