सांगली, ता.१८: सांगली विधानसभा क्षेत्राच्या महिला अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांच्या प्रचारार्थ आज सांगली शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात येत होते. जागोजागी महिलांनी त्यांचे औक्षण करून विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. या फेरीत युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उघड्या जीपमध्ये उमेदवार जयश्री पाटील, पूजा पाटील, मोनिया कदम, हर्षवर्धन पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. सांगली विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली होती.
या फेरीची सुरुवात स्फूर्ती चौकातून झाली. पुढे दत्तनगर, हनुमान नगर, प्रगती कॉलनी, पाकिजाच्या मज्जिद समोरून शामराव नगर, भरत नगर, हरिपूर रोड, सिद्धार्थ परिसर, गाव भाग मारुती मंदिर मार्ग, मारुती रोड, सांगलीवाडी, गणपती पेठ, अंबा भवन, वखार भाग, जुना बुधवार रोड, पंचशील नगर, लक्ष्मीनगर, जकात नाका, साखर कारखाना, संजय नगर, अहिल्यादेवी चौक, संजय नगर, अहिल्यादेवी चौक, चिंतामणी नगर , कॉलेज कॉर्नर, आपटा पोलीस चौकी, काँग्रेस कमिटी, बदाम चौक, हिंदू-मुस्लिम चौक, जय भवानी रोड, राम मंदिर, पंचमुखी मारुती रोड, हिराबाग कॉर्नर येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.