सांगली दि.१७ – महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा पक्का निर्धार केल्याचे आजच्या पदयात्रेतून स्पष्ट झाले. आज गावच्या राममंदिरात नारळ फोडून पदयात्रा सुरु झाली.. महाआघाडीचे झेंडे नाचवत, पृथ्वीराजबाबा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, महाविकास आघाडीचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत पदयात्रा जुना जकात नाका -झाशी काॅलनी – राणा प्रताप चौक – झेंडा चौक – आरवाडे प्लॉट – म्हसोबा गल्ली – धनगर गल्ली – कुंभार गल्ली – विठ्ठल मंदिर – चावडी परिसर – मोहीते गल्ली ते राममंदिर येथे समारोप झाला.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘सांगलीवाडी जे ठरवते ते सांगलीत घडते. महापूर काळात सांगलीवाडी करांची सेवा करायला मिळाली. सांगलीवाडीच्या चौफेर विकासासाठी हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून द्या. पाच वर्षे तुमच्यासाठी राबलोय. पुन्हा पाच वर्षे आमदार म्हणून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, सांगलीतील गावभाग येथे पृथ्वीराज पाटील यांची प्रचार पदयात्रा संपन्न झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना उच्चांकी लिड देणार, असा निर्णय या भागातील नागरिकांनी घेतला आहे. पृथ्वीराजबाबा कामाचा व हक्काचा माणूस आहे. महापूर व कोरोना काळात त्यांनी केलेली मदत आम्ही कधीच विसरणार नाही. त्यांना आमदार करणारच अशी प्रतिक्रिया व्यक्त करत मोठय़ा संख्येने प्रचार पदयात्रेत गावभाग सहभागी झाला होता.
यावेळी पृथ्वीराज म्हणाले, ‘विद्यमान आमदारांनी सांगलीसाठी भरीव असे कांहीच केले नाही. महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार, औद्योगिक विकास याबाबत आमदार निष्क्रिय राहिले. आता त्यांना बदलले पाहिजे. भाजपा हा पक्ष फक्त जाती धर्मात भांडणे लावतो. त्याचा पराभव करण्यासाठी माझ्या नावासमोरील हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून द्या. ‘
छ. शिवाजी महाराजांना अभिवादन करून पदयात्रा सुरु झाली. मारुती चौक-जैन बस्ती-विवेकानंद चौक-नवभारत चौक – वीरभद्र मंदीर – केशवनाथ मंदीर ते मारुती चौकात येऊन पदयात्रेचा समारोप झाला. महाविकास आघाडीचे झेंडे आणि विजयाच्या घोषणा देत हजारो नागरिक सहभागी झाले होते.
पदयात्रेत प्रितम रेवणकर, शुभम बनसोडे, शितल सदलगे, डॉ. विनय संकपाळ, देवा कांबळे, सिध्दार्थ कुदळे, सचिन घेवारे, मयूर पेडणेकर, जोहेब पन्हाळकर, यासीन मुल्ला, कुणाल गालिंदे, टिपू पेंढारी, ओंकार कबाडगे, चेतन दडगे, प्रसाद गवळी, विलास खेराडकर, जाहीर शेख, आरबाज शेख व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि गावभागातील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.