सांगली दि.१६: काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी गृहभेटी, गृहबैठका व पदयात्रेच्या माध्यमातून मतदार संघ पिंजून काढला आहे. सांगली आणि मतदार संघातील परिसराच्या गावांत त्यांच्या प्रचाराचा धुरळाच उठला आहे.ते सध्या प्रचारात सर्वात आघाडीवर आहेत. प्रचाराच्या अंतीम टप्प्यात पृथ्वीराज पाटील यांनी जोरदार मुसंडी मारली आहे.
वार्ड क्र. १५ मधील शामरावनगरात महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या पदयात्रेत हजारो नागरिक हातात महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे झेंडे नाचवत, घोषणा देत सहभागी झाले होते.या प्रचार पदयात्रेचा प्रारंभ गारपीर चौकात श्रीफळ वाढवून झाला. गारपीर चौकातून सुरु झालेली पदयात्रा शंभरफुटी रोड, रमामातानगर, काळे प्लाॅट ते गणेशनगर येथे समाप्त झाली. पृथ्वीराजबाबा पाटील या भागातील लोकांना भेटत होते. नमस्कार करुन आशीर्वाद घेत होते. लोक त्यांना विजयी भव असा आशीर्वाद देत होते. पृथ्वीराजबाबा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, काँग्रेस पक्षाचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो, राहूल गांधी की जय अशा घोषणांनी शामरावनगर काँग्रेसमय झाले होते. पृथ्वीराजबाबा उच्चांकी मतांनी निवडून येणार अशा प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत होत्या. मध्यमवर्गीय व कष्टकरी कामगार अशी संमिश्र लोकवस्तीच्या भागात काँग्रेस आणि पृथ्वीराज पाटील यांना नागरिकांचा उदंड पाठिंबा दिसून येत होता. आमचा पृथ्वीराज बाबा सांगलीसाठी खंबीर उभा या गाण्यानं नागरिक भलतेच खूष दिसत होते.ठिकठिकाणी पृथ्वीराज पाटील यांचे औक्षण करुन त्यांच्यावर पुष्पवृष्टी होत होती.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘शामरावनगर मधील जनता ही कायम काँग्रेस पक्षाच्या पाठिशी खंबीरपणे उभी असते. गेल्या विधानसभा निवडणुकीत या भागात मला चांगले लिड मिळाले होते. आताही हा भाग माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. गेल्या पाच वर्षात सतत मी या भागातील जनतेच्या संपर्कात आहे.कोरोना आणि महापूर काळात या भागातील लोकांना मी मदत केली होती. लोकांच्या सूख दुःखात सहभागी झाल्याने शामरावनगरचे नागरिक माझ्यावर निस्सीम प्रेम करतात. त्यामुळे खासदार राहूल गांधी यांच्या नफरत छोडो भारत जोडो याची अनुभूती मिळते. लोकांचे उदंड प्रेम मला विजयी करणार असा विश्वास प्रदान करते.
या पदयात्रेत माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, रज्जाक नाईक, ताजुद्दीन शेख, बबलू केरीपाळे, इरफान जमादार, मन्सूर नाईक, अज्जू पटेल, विजय आवळे, शाहरुख सनदी, याकूब मणेर, अझहर मकानदार, जब्बार पटेल, रमेश शेख, नासीर पट्टेवाले, रहीम हट्टिवाले, इम्रान जमादार व शामरावनगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पृथ्वीराज पाटील यांनी जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत होते.