Monday, December 23, 2024
Google search engine
Homeसांगली जिल्हाविस्तारित भागातील नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवण्याचे पाप आमदार गाडगीळ यांचेच

विस्तारित भागातील नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवण्याचे पाप आमदार गाडगीळ यांचेच

पृथ्वीराज पाटील यांचा हल्लाबोल; एसीमध्ये राहणाऱ्या आमदारांचे पाय दलदलीत कधी रुतलेच नाहीत

सांगली दि.१४ (प्रतिनिधी) – सांगली शहराच्या विस्तारीत भागातील नागरीकांना ह नागरी सुविधा पासून वंचित ठेवण्याचे महापाप हे आमदार गाडगीळ यांचेच आहे. पॉश एरियात एसीमध्ये राहणाऱ्या आमदारांचे पाय प्रभाग क्र.८ मधील दलदलीत कधी रुतलेच नाहीत त्यामुळे त्यांना या भागातील नागरिकांच्या नरकयातना कधी कळल्याच नाहीत. सत्यसाईनगर, विवेकानंद सोसायटी, अकुज व पार्श्वनाथ नगर, तुळजाईनगर, जिजामाता काॅलनी, विद्यानगर, चैत्रबन काॅलनी, झेपी व विकास काॅलनी, विजयनगर, गंगानगर, शामनगर, अष्टविनायकनगर, मंगलमूर्ती काॅलनी आणि सैनिकनगर या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात गाडगीळ सपशेल अपयशी ठरले आहेत. नागरिकांच्या नरकयातनेला विद्यमान आमदारच जबाबदार आहेत. असा हल्लाबोल पृथ्वीराज पाटील यांनी केला आहे.

पृथ्वीराज पाटील यांनी आज प्रभाग क्र.८ मधील विविध भागात नागरिकांच्या भेटी घेऊन बैठकीत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. रस्त्यांची कामे व गटारींची दुरवस्था, घाणीचे साम्राज्य,ठिकठिकाणी वाढलेली झुडपं, पावसाच्या पाण्याचे व सांडपाण्याची डबकी व त्यामध्ये डासांची उत्पत्ती, मोकाट जनावरे व भटकी कुत्री, बंद पथदिवे, महिलांची सुरक्षितता अशा अनेक प्रश्नांनी नागरिक त्रस्त आहेत. गेल्या दहा वर्षांत आमदार फिरकलेच नाहीत. गेली अडीच वर्षे निवडणूकच झाली नसल्याने महापालिका प्रशासनाने केलेले दुर्लक्ष यामुळे या विस्तारीत भागातील जनतेवर मोठा अन्याय झाला आहे. कर भरुनही नागरी सुविधा नाहीत. आता ही या प्रभागाची दुर्दशा संपवायची आहे. त्यासाठी मला माझ्या नावासमोरील हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले.

प्रभाग क्र. ८ मध्ये प्रचारानिमित्त पृथ्वीराज पाटील, विजया पाटील व विरेंद्रसिंह पाटील यांनी नागरिकांना भेटून समस्या ऐकून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले.

पृथ्वीराज पुढे म्हणाले, ‘महागाई, बेरोजगारी, महिला असुरक्षितता, नागरी सुविधांचा अभाव यामुळे जनता हैराण झाली आहे. आता वीस तारखेला मतातून जनता भाजपा आमदाराला धडा शिकवणार आहे. पाच वर्षे मी राबलोय. अजून बरीच कामे करायची आहेत. प्रभाग क्र. ८ स्मार्ट प्रभाग करायचा आहे. मला आमदार म्हणून निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. ठिकठिकाणी आयोजित बैठकीत या प्रभागातील नागरिकांनी पृथ्वीराज पाटील यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला.

यावेळी प्रशांत देशमुख,भारती भगत, नितीन मिरजकर, जितू हेगडे, विनायक शिंदे, प्रकाश पाटील, संजय पाटील, नितीन साळे, महावीर चोपडे, शितल खाडे, संगिता पाटील, युवराज शिंदे, दिपक व अमर शिंदे, रुपेश मोकाशी, प्रदीप साळवी, संभाजी रजपूत, मनोज लांडगे, स्वप्नील औंधकर,अभिजित पाटील, चंपाबाई कागे, सुरजित डोंगरे, अधिक लोहार, अमोल गडदे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments