Monday, December 23, 2024
Google search engine
Homeसांगली जिल्हापृथ्वीराज पाटील यांना मत म्हणजे राहुल गांधींना मत - खा. इम्रान प्रतापगढी

पृथ्वीराज पाटील यांना मत म्हणजे राहुल गांधींना मत – खा. इम्रान प्रतापगढी

सांगलीत पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ खा. इम्रान प्रतापगढी यांची सभा संपन्न

सांगली दि.१३ (प्रतिनिधी) : भाजपा महाराष्ट्र लुटून गुजरातला नेत आहे. जाती धर्मात तेढ निर्माण करुन नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करत आहे. खा. राहुल गांधी यांनी ४००० किमी पायी चालत भारत जोडो यात्रा केली ती नफरत छोडो भारत जोडो यासाठीच. महाराष्ट्रात मुली व महिलांचे लैंगिक शोषण व अत्याचार भयानक आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. ४०० चा गॅस १००० झाला. कफनवरही जीएसटी. शाळेच्या दफ्तरवर जीएसटी.. हे महायुती सरकार लुटारू आहे. पृथ्वीराजबाबा यांना विधानसभेत पाठवणे म्हणजे भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या कामाची मजूरी आहे, असे आवाहन आज सांगलीत पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खा. इम्रान प्रतापगढी यांनी केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, लोकशाही व स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. ते वाचवण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. राज्यभर महाआघाडीची हवा आहे. पृथ्वीराज पाटील हे गेल्या निवडणुकीत अत्यल्प मतांनी हरले पण गेली पाच वर्षे ते सांगलीसाठी राबताहेत. त्यांना स्वतःच्या प्रपंचापेक्षा हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी विजयी करा.
यावेळी पृथ्वीराज म्हणाले, जर २०१९ ला खा. इम्रान प्रतापगढी सांगलीत आले असते तर मी विजयी झालो असतो. शंभरफुटी शामरावनगर हा भाग कष्टकरी कामगार वर्गातील लोकवस्तीचा आहे. इथला इनाम जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांची नरकयातनेतून सुटका करण्यासाठी मला इथले लोक विधानसभेत पाठवणार आहेत. माझा लढा धर्मांध शक्तीशी आहे. अपक्षाला मत म्हणजे भाजपाला मत होय. सावधपणे काँग्रेस व महाआघाडीच्या हातावर मतदान करा.. गेल्या वेळची थोडक्यात हुकलेली आमदार होण्यासाठी संधी द्या. सांगली अधिक चांगली केल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी निरिक्षक खा. करणसिंग, आ. प्रकाश नहाटा, शंभूराज काटकर, रज्जाक नाईक,मुन्ना कुरणे,करीमभाई मेस्त्री, मयूरशेठ पाटील, ताजुद्दीन शेख,अभिजित भोसले, मंगेश चव्हाण, किरण सुर्यवंशी,बल्लू केरीपाळे, आसिफ बावा, शेरुभाई सौदागर, उमर गवंडी, इरफान जमादार, बाबगोंडा पाटील, मन्सूर नाईक, शाहरुख सनदी, प्रा.एन.डी.बिरनाळे, अजिज मेस्त्री, अज्जू पटेल, इलाई बारूदवाले, आयुब बारगीर, फारूक मुल्ला, विपुल व बंडू केरीपाळे, अमीर शेख, इरफान शिकलगार, रविंद्र वळवडे, ज्योती आदाटे, कल्पना शेळके, सुकुमार कांबळे, अजित सुर्यवंशी, डॉ. नामदेव कस्तुरे व परिसरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments