Monday, December 23, 2024
Google search engine
Homeसांगली जिल्हासामाजिक न्यायाच्या लढाईत वकिलांचे लक्षवेधी योगदान : पृथ्वीराज पाटील

सामाजिक न्यायाच्या लढाईत वकिलांचे लक्षवेधी योगदान : पृथ्वीराज पाटील

सांगली दि.१२: कनिष्ठ न्यायालयापासून सुप्रिम कोर्टापर्यंत कार्यरत न्यायाधीश आणि न्यालयीन कर्मचारी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा खरा सन्मान करतात. भारतीय स्वातंत्र्य लढा हा प्रामुख्यानं वकील असलेल्या नेत्यांनी जनतेच्या बळावर यशस्वी केला. संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही वकिलच होते.सहकार तपस्वी माजी खासदार माझे वडील स्व. गुलाबराव पाटील हे वकिलच होते. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देताना त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याची प्रेरणा वकीलच मिळते, असे प्रतिपादन सांगली विधानसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी केले.

सांगली शहरातील समस्या आणि भविष्यातील सांगली कशी असावी याबाबत उत्तम मार्गदर्शन वकील करु शकतात अशी माझी खात्री आहे. असे प्रतिपादन सांगली बार असोसिएशनमध्ये वकिलांशी संवाद साधताना महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी केले.

यावेळी वकिल मंडळींशी बोलताना ते पुढे म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत सांगलीकरांसाठी मला जे जे करणे शक्य होते ते केले आहे. कोराना व महापूर काळात केलेल्या मदतीबद्दल सांगलीकर कायम कृतज्ञता व्यक्त करतात. सांगली कायमस्वरूपी पूरमुक्त व्हावी हा माझा ध्यास आहे. नागरिकांना शुध्द व मुबलक पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, उद्योग व्यापारवृध्दी,कृषिविकास,
रोजगार निर्मिती, महिला संरक्षण, गुणवत्तायुक्त शिक्षण व आरोग्य आणि विशेषकरून समताधिष्ठीत समाज रचना यासाठी मला विधानसभेत पाठवा. विद्यमान आमदारांकडे क्षमता व दूरदृष्टीचा अभाव असल्याने सांगलीचा विकास कुंठित झाला आहे. सांगलीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मला पाच वर्षे आमदार म्हणून संधी द्या. आमदार कसा असावा हे सिध्द केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या सार्वजनिक जीवनात कायम वकिल मंडळी मैत्रीपूर्ण मार्गदर्शन करतात. शहराचा विकास आराखडा राबवतात मला वकिलांचे मार्गदर्शन अधिक उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तुमचा आशीर्वाद आणि पाठबळ मला अधिक उर्जा देणारी आहे.’

अनेक वर्षे प्रलंबित व मंजूर असलेले कोल्हापूर खंडपीठ तातडीने व्हावे, झारखंड व कर्नाटक राज्यांप्रमाणे ज्युनिअर वकिलांना दरमहा रु. ५००० स्टायफंड मिळावा, वकिल भवनाची उभारणी करावी, वकिलांना पेन्शन मिळावे यासाठी आमदार म्हणून शासन दरबारी आमच्या मागण्या लावून धराव्यात यासाठी आम्ही आपल्या पाठिशी आहोत असे सांगून वकिलांनी विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पृथ्वीराजबाबा पाटील यांनी वकिलांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवणार त्यासाठी हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.

यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र रजपूत यांनी स्वागत करुन मागण्यांचा तपशील सादर केला. आभार पल्लवी कांते मॅडम यांनी मानले. यावेळी जे. व्ही. पाटील, उत्तमराव निकम, पी. टी. जाधव, जयंत नवले, अमोल चिमाण्णा,विजय चव्हाण, सर्जेराव मोहीते, अशोकराव वाघमोडे, सुर्यवंशी मॅडम व बारचे सर्व सदस्य, पक्षकार व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments