Monday, December 23, 2024
Google search engine
Homeसांगली जिल्हासांगलीच्या चौफेर विकासासाठी पृथ्वीराज पाटील यांनाच निवडून देण्याचा प्रभाग क्र. १७ मधील...

सांगलीच्या चौफेर विकासासाठी पृथ्वीराज पाटील यांनाच निवडून देण्याचा प्रभाग क्र. १७ मधील नागरिकांनी केला निर्धार

सांगली दि.६ (प्रतिनिधी) – सांगलीच्या चौफेर विकासासाठी पृथ्वीराज पाटील यांनाच निवडून देण्याचा निर्धार केल्याचे प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांनी व्यक्त केला. विश्रामबाग सांगली येथील श्री गणेश मंदिरात पृथ्वीराज पाटील यांनी दर्शन घेऊन प्रभाग क्र. १७ मध्ये गणपती मंदिर परिसर व नागराज काॅलनीतील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रभाग १७ मधील खराब रस्ते, पार्किंग, अस्वच्छता, कमी दाबाने व अशुद्ध पाणीपुरवठा हे प्रश्न निकाली काढणार अशी ग्वाही देत पृथ्वीराज म्हणाले, ‘औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मिती, चांगले रस्ते, गटारी, स्वच्छता, शुध्द व मुबलक पाणी पुरवठा, वीज व घरपट्टी कमी करणे, पर्यटन स्थळे निर्माण करणे, भुयारी गटार, महिलांची सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारी कमी करणे, व्यापारी व उद्योजक, पालक व विद्यार्थी, महिला यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधीमंडळाचा उपयोग जनतेला करुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असल्याचे सांगितले.हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.

यावेळी विरेंद्र पृथ्वीराज पाटील, ऋतुराज शिवराज पाटील, संतोष भोसले,मारुती नवलाई, तोडकर आण्णा, संजय व रविंद्र काळोखे, विश्वास लोंढे, सुधाकर कांबळे, सतीश जगदाळे,प्रकाश बरडोले,सुभाष तोडकर, अरुण गायकवाड, संकेत पाटील, धनंजय कुंडले, सागर साळुंखे, तिप्पण्णावर इंजिनिअर, राहूल देवकते, शिरीष सुर्यवंशी, संजय बिजरगी, ललीत दाभाडे,रावसाहेब भोसले,विनय कांबळे, मधु सुपनेकर, अजित चव्हाण, सूरज राऊत, संग्राम शेवाळे, प्रदीप मोरे, विशाल लालवाणी,मृगेंद्र छप्रे, सुरेश मुसलगिरी,अविनाश वाघमारे,अनिल नगराळे,अरीफ व मोहसिन शेख, प्रकाश शिंदे, विशाल कुंभोजकर, प्रा. एन.डी.बिरनाळे, नितीन तावदारे, रघुनाथ नार्वेकर व प्रभाग क्र. १७ मधील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पक्ष व इतर घटक पक्षाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments