सांगली – विविध उपक्रमांनी योग अर्चना क्लासचा वर्धापन दिन अतिशय उत्साहात पार पडला. मालतीकाकी जोशी आणि डॉ. आर आर हेर्लेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पंचशील नगर येथील योग अर्चना या योगासन क्लासचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. डॉक्टर हेर्लेकर यांनी बदलत्या जीवनशैलीत सुदृढ प्रकृतीसाठी नियमित योगासने अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. योग गुरु अर्चना ऐनापुरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यानिमित्त सभासदांनी योगासनाचे विविध उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरे केले. सचिन सुतार, प्रवीण मुंडे, चेतना मुंडे, वैशाली गायकवाड, निर्मला गुरव, पुनम सूर्यवंशी, नीपा ठाकर यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन पुनम रेणके यांनी केले. आभार राजेंद्र शिरगुपे यांनी मानले.