सांगली – महाराष्ट्र राज्याच्या जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळावर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा दिगंबर जैन कासार समाज संस्थेच्या वतीने सत्कार संपन्न झाला.
श्री रावसाहेब पाटील यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील जैन समाजाच्या विविध समस्या शासन दरबारी मांडून सोडवल्या जातील, असा विश्वास कासार समाज संस्थेचे अध्यक्ष श्री.पोपटलाल डोरले यांनी या सत्कार प्रसंगी व्यक्त केला. तसेच त्यांनी कासार समाज संस्थेच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन श्री रावसाहेब पाटील यांना याप्रसंगी दिले.
या निवेदनामध्ये त्यांनी अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या विविध समित्यांमध्ये कासार समाजाला प्रतिनिधित्व द्यावे आणि दिगंबर जैन कासार समाजाला समस्त जैन समाजाच्या विकासात सहभागी करून घ्यावे, अशी प्रमुख मागणी केली.
या सत्काराप्रसंगी दिगंबर जैन कासार समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री पोपटलाल डोरले, उपाध्यक्ष श्री प्रकाश मांगले आणि श्री सागर घोंगडे उपस्थित होते.