Monday, December 23, 2024
Google search engine
Homeसांगली जिल्हासांगली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; सुभाष खोत यांची मागणी

सांगली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; सुभाष खोत यांची मागणी

सांगली – जिल्ह्यामध्ये नेहमीपेक्षा दीडपट पाऊस झालेला आहे त्यामुळे शेतामधील भुईमूग, सोयाबीन, उडीद, तुर, पेरा झालेला ज्वारी, शाळू आणि द्राक्ष पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची या पावसामुळे सत्यानाश झालेला आहे. वरील सर्व पिकांचा ताबडतोब पंचनामा करून मदत ही शेतकऱ्यांना दिलीच पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी यांना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाष खोत यांनी दिला आहे.

शासनाचे समाजातील सर्व घटकाकडे ताबडतोब लक्ष देण्याची तात्परता असते तसेच या देशाला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्याकडे सुद्धा ती तात्परता असावी. नेहमीपेक्षा दीडपटीने पाऊस पडून सुद्धा शासनाने शेतकऱ्यांच्या कडे ढुंकून बघायला सुद्धा तयार नाही अशा शासनावर या जिल्ह्यातील शेतकरी अतिशय नाराज आहे.

विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फटाके उडल्याप्रमाणे निवडणुकीत मतदान खेचण्यासाठी धडाधड निर्णय घेतले पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक सुद्धा निर्णय झालेला नाही मग या शासनकर्त्यांना शेतकऱ्यांच्या विषयी किती काळजी आहे हे स्पष्ट होतं.

शासन किती कुणाला काय दिलं याबद्दल शेतकरी एक शब्द सुद्धा बोलत नाही कुणाविषयी तक्रार करत नाही आणि तक्रार नाही मग आमच्या शेतकरी बांधवांच्या बद्दल शासन उदासीन का असा खडा सवाल सुभाष खोत यांनी विचारलेला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आणि त्यांच्यासमोर उभे असलेल्या संकटाबद्दल काळजीपूर्वक विचार करून आज शेतकऱ्यांना जी मदतीची गरज आहे. त्यासाठी पुढाकार घेऊन ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची जास्तीत जास्त काळजी घेऊन त्यांनाही मदतीची गरज आहे, याची जाणीव ठेवून शासनाने त्वरित आपला निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सुद्धा शेवटी त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments