Monday, December 23, 2024
Google search engine
Homeप्रादेशिकमहिला आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा रूपाली चाकणकर यांच्याकडेच

महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा रूपाली चाकणकर यांच्याकडेच

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांचीच फेर नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 22 तारखेला चाकणकर यांचा कार्यकाळ संपणार होता मात्र तत्पूर्वीच आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा रुपाली चाकणकर यांच्याकडे सोपवण्यात आली. चाकणकर यांच्या नियुक्तीचे गॅझेट नुकतच प्रसिद्ध करण्यात आले.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी सात आमदारांचा काल शपथविधी पार पडला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही विधान परिषदेची आमदारकी मिळणार असल्याची चर्चा होती. त्यांच्या नावाला पक्षातूनच विरोध झाला. एकाच व्यक्तीला सगळी पदं देणार का, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी विचारला होता. राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादीत चाकणकर यांचं नाव नव्हते. त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हे पद राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. चाकणकर यांचा कार्यकाळ 22 ऑक्टोबरला संपणार आहे.

1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1993 मध्ये महाराष्ट्रातही महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, महिलांची समाजातली स्थिती सुधारण्यासाठी आणि महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करतं.

महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत येणारं राज्य महिला आयोग एक मंडळ आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. महिला आयोगाच्या अध्यक्षाची आणि सदस्यांची निवड राज्य सरकारकडून होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments