Monday, December 23, 2024
Google search engine
Homeप्रादेशिकमहाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं

‘या’ तारखेला होणार मतदान; एकाच टप्प्यात होणार निवडणूक

मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत यासंदर्भात घोषणा केली.

यावेळी माहिती देताना केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांना भेट दिली होती. आम्ही तेथील सर्व व्यवस्थेचा अभ्यास केला होता. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असून 288 जागांवर मतदान होणार आहे. यातील 234 जागा या सर्वधाराण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी 25 तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत.

ते पुढे म्हणाले की, जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्व बूथवर सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्येष्ठ नगारिक आणि दिव्यांगांना घरातून मतदान करण्याची सुविधा आम्ही दिली आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेचा काळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहेत. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी उमेदवार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments