Monday, December 23, 2024
Google search engine
Homeसांगली जिल्हाश्री दत्त इंडियाचा आठवा बॉयलर अग्नी प्रदिपन खा. विशालदादा पाटील यांचे हस्ते...

श्री दत्त इंडियाचा आठवा बॉयलर अग्नी प्रदिपन खा. विशालदादा पाटील यांचे हस्ते संपन्न

सांगली (प्रतिनिधी) – श्री दत्‍त इंडिया प्रा., लि. सांगली (ऑपरेटर ऑफ वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.,सांगली) या कारखान्‍याचा आठवा बॉयलर अग्‍नी प्रदिपन सोहळा चेअरमन, खासदार विशालदादा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्‍नी सौ पुजाताई (वहिनी) विशालदादा पाटील यांचे हस्ते दस-याचे शुभ मुहूर्तावर दि. १२/१०/२०२४ रोजी सकाळी संपन्न झाला.

यावेळी कारखान्याचे चेअरमनसो खासदार श्री. विशलदादा पाटील यांनी सर्व ऊस उत्पादक शेतक-यांना आहवान केले की आपला जास्तीत जास्त ऊस आपले कारखान्यास पाठवून गळीत हंगाम यशस्वी करणेचे आवाहन केले.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन सर्व संचालक, शेतकरी सभासद,ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार कामगारवर्ग, वसंतदादा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील, श्री दत्त इंडिया प्रा.लि.,चे कार्यकारी संचालक, मृत्युंजय शिंदे,सेक्रेटरी आनंदा कोरे, शेती अधिकारी मोहन पवार, वर्क्स मॅनेंजर, चिफ केमिस्ट, साखर कामगार युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.

कारखाना सभासदांना सवलतीच्या दराने दस-याचे शुभ मुहूर्तावर साखर वाटप सुरु करणेत आले आहे. सदर साखर वाटप हे सभासदांचे सोईसाठी गटवाईज सुरु करणेत आले आहे. यामुळे सभासदाची गैरसोय होणार नाही. या उद्देशाने तरी सर्व सभासदांनी आपली साखर नियोजित तारखेच्या प्रमाणे नेऊन सहकार्य करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments