सांगली, दि.७ : या पुढील काळात गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी उपद्रव करून एमआयडीसी मधील कारखानदारांना विविध कारणासाठी पैशाची मागणी केली, त्यांच्यावर पैशासाठी जबरदस्ती केली तर संबंधितावर खंडणी सारखे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील एमआयडीसी मधील उद्योजकांच्या बैठकीत संवाद साधताना दिली.
सांगली जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी मधील उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख श्री. संदीप घुगे यांनी उद्योजकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की यापूर्वी झालेल्या बैठकीत दिलेल्या सूचनाप्रमाणे आपण कुपवाड एमआयडीसी येथे पोलीस चौकीची स्थापना केल्याने चोऱ्यांचे प्रमाण बरेचसे कमी झाले आहे परंतु काही गुंड प्रवृत्तीचे लोक उपद्रव करून एमआयडीसीमध्ये विविध कारणासाठी उद्योजकांकडून पैशाची मागणी करीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
यावेळी सांगली एमआयडीसी मधील उद्योजकांनी आपल्या अडचणी सांगताना म्हटले आहे की, कुपवाड येथे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध खोकी धारक आहेत. देशी दारूची दुकाने उशिरापर्यंत चालू असतात. सध्या कोपवाड येथे रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा होतो, त्यामुळे उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सदर मुद्द्यांच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी म्हटले की गुंड प्रवृत्तीचे लोक उपद्रव करून एमआयडीसी मधील उद्योजकांकडून पैशाची मागणी करतात. आपण जर तशा तक्रारी दिल्यास, त्यांच्यावर खंडणी सारखे गुन्हे दाखल करून कठोरपणे कायदेशीर कारवाई करू. अवैद्य खोक्याच्या बाबतीत त्यांचे मनपा प्रशासनाकडून अतिक्रमण काढून घेण्यात घेण्यासाठी पुढील कारवाई करण्यात येईल. कुपवाड मधील रस्त्याच्या धेमे गतीने चाललेल्या कामाबाबत बोलताना ते म्हणाले की या ठिकाणी दोन ट्राफिक अंमलदार नेमण्यात येतील. उद्योजकांनी एमआयडीसी मधील सर्व कामगारांचे चारित्र्य पडताळणी करून त्यांचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावेत अशा सूचनाही श्री. संदीप घुगे यांनी यावेळी केल्या.
सदर बैठकीसाठी एमआयडीसी प्रादेशिक अध्यक्षा श्रीमती वसंतराव बिरजे, कामगार आयुक्त कार्यालयातील श्री सी. टी. गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, उपविभागीय अधिकारी शहर विभाग श्रीमती विमला एम. उपविभागीय अधिकारी श्री प्रणिल गिल्डा, मिरज विभाग, मिरज, पोलीस निरीक्षक श्री. सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस निरीक्षक श्री. बयाजीराव कुरळे, संजयनगर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री. प्रविण कांबळे, विश्रामबाग पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिपक भांडवलकर, कुपवाड पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक श्री. अकीब काझी, जिल्हा विशेष शाखा, उद्योजक श्री. रमाकांत मालू, श्री. अनंत चिमण, श्री. सचिन घेवारे, श्री. हर्षल खरे, श्री. भावेश शहा, श्री. राहुल पाटील यांचेसह १८ ते २० उद्योजक उपस्थित होते.