सांगली (प्रतिनिधी) – सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी आपल्या प्रचारार्थ विविध भागातील मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. जयश्रीताई पाटील यांनी आज हरिपूर, धामणी, अंकली या गावांसह सांगलीत प्रभाग क्रमांक नऊ आणि पंधरा या प्रभागातील नागरिकांच्या भेटी घेतल्या.
यावेळी बोलताना जयश्रीताई पाटील म्हणाल्या, काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आणि ज्येष्ठांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या आग्रहाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोठ्या प्रमाणात सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस प्रेमी वसंतदादा प्रेमी सर्व आमच्या विजय बंगल्यावर जमा झाले व त्यांनी मला ताकद प्रेरणा व आशीर्वाद दिले त्यासमोर मला नमून अर्ज भरावा लागला, असल्याचे त्यांनी सांगितले.
आज जयश्रीताई पाटील यांनी हरिपूर, धामणी, अंकलीसह सांगली शहरातील वृत्तपत्र विक्रेते आणि वार्ड क्रमांक 9, वार्ड क्रमांक 15 आशा विविध भागात भेटी दिल्या. विषेशतः तिकीट नाकारल्यानंतर श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्यावर अन्याय झाल्याची भावना महिला वर्गात चर्चेदरम्यान दिसून येत होती. त्यामुळे महिला भगिनींचे समर्थन श्रीमती जयश्रीताई पाटील यांना मिळत असल्याचे दिसून येत आहे.
“वहिनी तुम्ही आता रडू नका तुम्ही लढा ही नारीशक्ती काय आहे या सर्वांना आपण दाखवून देऊ” अशा आशयाच्या प्रतिक्रिया माता-भगिनी देत असल्याचे दिसून येते.