Monday, December 23, 2024
Google search engine
Homeसांगली जिल्हासांगलीत वसंतराव देशमुखांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

सांगलीत वसंतराव देशमुखांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

महिलांबाबत भाजपचे दुटप्पी धोरण उघड : जयश्रीताई पाटील

महिलांबाबत भाजपचे दुटप्पी धोरण उघड : जयश्रीताई पाटील

सांगली (प्रतिनिधी) – एका बाजूला महिलांना 50 टक्के आरक्षणाची भाषा केली जाते आणि दुसऱ्या बाजूला महिलांबाबत आक्षेपार्य विधान करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे कसले दुटप्पी धोरण भारतीय जनता पार्टी देशात व महाराष्ट्रात राबवत आहे? हे कळत नाही, असा प्रश्न सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी आज उपस्थित केला.

नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुलगी बद्दल आक्षेपार्य विधान करणा-या वसंतराव देशमुख यांच्या प्रतिमेला विष्णू अण्णा भवन येथे जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी बोलताना श्रीमती जयश्रीताई पाटील म्हणाल्या, नुकत्याच झालेल्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये लोकांना भूलथापा मारून जातीपातीत अडकून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सर्वसामान्य मतदारांच्या लक्षात आल्यावर आपला जनाधार घटत आहे. याची जाणीव झाल्यानंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये परत सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत. त्यातूनच लाडकी बहीण योजना आणून त्यात महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जात आहे ठीक आहे. माझ्या बहिणींना पैसे मिळत आहेत त्याबद्दल आम्हाला आनंद आहेच. मात्र एका बाजूला महिन्याला दीड हजार द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला महिलांची अब्रू वेशीवर टांगायची हा कुठला प्रकार आहे? हा आमच्या बहिणीने आता ओळखला पाहिजे.

सुसंस्कृत म्हणून आपल्या महाराष्ट्राची राजकीय परंपरा ओळखली जाते संतांचा महाराष्ट्र, थोरांचा महाराष्ट्र, सहकार पंढरीचा महाराष्ट्र, मात्र गेल्या काही दिवसांपासून महिलांच्यावर अत्याचार करणारा महाराष्ट्र, महिलांची अब्रू वेशीवर टांगणारा महाराष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात कोण करत आहे? हे माझ्या बहिणींनी आणि भावाने आता ओळखले पाहिजे.

ज्या ठिकाणी आपल्या बहिणी सुरक्षित नाही दिवसाढवळ्या अत्याचार करत आहेत त्यातून तीन वर्षाची मुलगी ही सुटली नाही व 70 वर्षाची माझी आई सुद्धा चुकली नाही. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आपला? या सर्व बाबींचा मी निषेध व्यक्त करत असल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या, राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुसंस्कृतपणा आणि महिलांची सुरक्षितता याबाबत म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून आरोप करण्याचा प्रयत्न होत आहे. तरीसुद्धा मी डगमगून न जाता आम्हाला वारसातून मिळालेली जबाबदारी निभावून नेण्यासाठी मी सज्ज आहे आपण सर्वजण सज्ज राहूया, असेही श्रीमती जयश्रीताई पाटील म्हणाल्या. 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments