Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeसांगली जिल्हासांगलीकरांचा निर्धार जयश्री मदन पाटीलच आमदार!

सांगलीकरांचा निर्धार जयश्री मदन पाटीलच आमदार!

जयश्री मदन पाटील यांच्या पदयात्रेला महिलांसह, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली, दि.13 (प्रतिनिधी) : सांगली विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी आज स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून आपल्या प्रचार फेरीला सुरुवात केली. यावेळी जयश्री मदन पाटील यांची महिलांमध्ये मोठी क्रेझ पहायला मिळाली. प्रचंड उत्साहाने युवक, युवती प्रचारात सक्रिय होते. जयश्री पाटील यांना सर्वाधिक मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार नागरिकांनी केला.

यावेळी ‘सांगलीकरांचं ठरलंय वारं फिरलय’, ‘एकच निर्धार जयश्री पाटीलच आमदार’ अशा घोषणा देण्यात आल्या.यामध्ये मगरमच्छ कॉलनी, बागवान हॉल, गवळी गल्ली, सूर्यवंशी गल्ली,पेठभाग, गणपती पेठ मार्गे पटेल चौकात पदयात्रेची सांगता झाली. तत्पूर्वी सांगलीचे आराध्य दैवत गणपती मंदिरात जाऊन जयश्री मदन पाटील यांनी गणरायाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.

या पदयात्रेत शेकडो कार्यकर्ते, स्वाभिमानी मदन भाऊ प्रेमी सहभागी झाले होते. याचबरोबर युवानेते संग्राम पाटील, माजी नगरसेवक संतोष पाटील, मनोज सरगर, प्रकाश मुळके, माजी नगरसेविका रोहिणी पाटील, शेवंता वाघमारे, माजी महापौर किशोर शहा, शमकांत आवटी, कयूम पटवेगार, अमित – लाळगे, उत्तमदादा साखळकर, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रचार फेरीत जयश्री मदन पाटील यांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. तसेच ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत कऱण्यात आली. याचबरोबर अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून जयश्री मदन पाटील यांना आमदार तुम्हीच होणार अशा शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments