Monday, December 23, 2024
Google search engine
Homeसांगली जिल्हाशिवछत्रपती प्रेरणा पुरस्काराने वेदिका पाटील सन्मानित

शिवछत्रपती प्रेरणा पुरस्काराने वेदिका पाटील सन्मानित

इस्लामपूर (प्रतिनिधी) – राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा व विद्यार्थी हक्क कृती समिती पदाधिकारी मेळावा नुकताच इस्लामपूर येथे संपन्न झाला. यावेळी वशी (ता.वाळवा) येथील कु.वेदिका रणजित पाटील हिला शैक्षणिक उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार देण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार भगवानराव साळुंखे(आप्पा), माजी जि. प. सदस्य आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील-उंडाळकर इस्लामपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय हारुगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट वाळवा तालुका अध्यक्ष केदार पाटील (दादा), प्रदीप पाटील, चेतन पाटील, श्रीशैल्य पाटील, रामराजे काळे, विनोद बल्लाळ, रोहित पाटील, धनाजी सापकर, प्रतिक पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान या यशाबद्दल वेदिका हिचे किड्स केअर प्ले स्कूल ऐतवडे बुद्रुक, युवराज्ञी क्लासेस वशी यांच्यासह ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments