Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeक्राईमराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या

 मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञात तरुणांनी गोळीबार केला यात त्यांचा मृत्यू झाला आहे. वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर परिसरात ही घटना घडली.

तीन ते चार तरुणांकडून गोळीबार केला असल्याची माहिती मिळते आहे. लिलावती रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

शनिवारी रात्री ९ वाजता तीन ते चार तरुणांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला आहे. दोन ते तीन राऊंड त्यांच्यावर झाडण्यात आले, यातील एक गोळी त्यांच्या छातीत लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वीच त्यांना जीवेमारण्याची धमकी आली होती. एसआरए प्रकल्पातील वादातून ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

बाबा सिद्दीकी निर्मल नगर इथं एका जाहीर कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी झाली, त्याआडून हा गोळीबार झाला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच हा गोळीबाराचा प्रकार घडला आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणी सीसीटीव्ही तपासण्याचं काम करत आहेत. बाबा सिद्दीकी हे काँग्रेसमध्ये होते, त्यांनी नुकताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments