Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeप्रादेशिकरावसाहेब पाटील यांची जैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळावर अशासकीय सदस्य म्हणून...

रावसाहेब पाटील यांची जैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळावर अशासकीय सदस्य म्हणून निवड

दक्षिण भारत जैन सभेला प्रतिनिधीत्व दिल्याबद्दल जैन समाजामध्ये समाधान

सांगली : महाराष्ट्रामध्ये जैन समाज हा सधन दिसत असला तरी या समाजाच्या सामाजिक, विद्यार्थी. उद्योजक, शैक्षणिक संस्था, सामाजिक, धार्मिक संस्था यांच्या समोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचे निराकरण होण्यासाठी जैन समाजाला शासन दरबारी योग्य प्रतिनिधीत्व मिळावे अशी मागणी होत होती. त्याचा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व कामगारमंत्री ना. सुरेशभाऊ खाडे व आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी पाठपुरावा केला होता.

जैन समाजाची सद्यस्थिती व त्यांना जैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळावर प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी वरीष्ठ आणि प्रशासकीय पातळीवर केलेल्या प्रयत्नाना यश आले आणि त्याबाबत शासनाच्या निवडी जाहीर झाल्या. त्यामध्ये दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची महाराष्ट्र शासनाच्या जैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळावर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्याबाबतचा शासन निर्णय सचिवांनी काढला आहे.

या निवडीबाबत जैन समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निवडीबाबतच्या शासन निर्णयाचे पत्र ना. सुधीरभाऊ खाडे व आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी स्वतः येऊन श्री. रावसाहेब पाटील यांना दिले व त्यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी या दोघांनीही श्री. रावसाहेब पाटील यांची या पदासाठी योग्य निवड असून ते आमच्या पाठीमागे लागुन समाजाचे प्रश्न सोडवून घेतील कारण त्यांना विविध समित्यामध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे अशी भावना व्यक्त केली.

कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. श्री. रावसाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या दिलेल्या या जबाबदारीला योग्य न्याय देतील असे आश्वासन दिले. व निवडीसाठी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांना धन्यवाद दिले. यावेळी त्यांचा कर्मवीर पतसंस्थेच्यावतीने शॉल व पुष्पपुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, संचालक अॅड. एस.पी. मगदुम. डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. ओ. के. चौगुले (नाना), श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ. एस.बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, संचालिका श्रीमती भारती चोपडे तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री. लालासाहेब भाऊसाहेब थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम तसेच नगरसेवक श्री. सुरेश आवटी, उद्योजक श्री. सागर वडगांवे, श्री. काकासाो धामणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments