Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeसांगली जिल्हाराज्यातील एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या...

राज्यातील एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन

सांगली जिल्ह्यातील 25 महाविद्यालयातील केंद्रांचा समावेश

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने राज्यातील एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. राज्यातील अशा एक हजार केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 25 महाविद्यालयांतील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या ठिकाणी वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, वानलेसवाडी, सांगली येथे करण्यात आले. जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, प्राचार्य डॉ. रावसाहेब यल्लटी, ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. भगवान पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यात 25 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. निवडण्यात आलेल्या सर्व महाविद्यालयांसमवेत सामंजस्य करार (MOU) करण्यात आलेला आहे. केंद्र शासनातील विविध विभागांतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षणाशी निगडीत सर्व योजना व कार्यक्रमांखाली निधीची सांगड घालून एकात्मिक अंमलबजावणीद्वारे कार्यप्रवण वयोगटातील उमेदवारांचा व्यावसायिक कौशल्य विकास (Skill Development), कौशल्य वर्धन (Up Skilling) व पुनर्कौशल्य विकास (Reskilling) करण्यात येत आहे. यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments