Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeप्रादेशिकमनोज जरांगे-पाटील यांनी घेतली मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी यांची भेट; काय...

मनोज जरांगे-पाटील यांनी घेतली मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी यांची भेट; काय केली चर्चा?

जरांगे आज निवडणुकीची भूमिका जाहीर करणार!

छत्रपती संभाजीनगर – राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी यांचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. पुढच्या काही दिवसांत दोन्ही आघाड्या याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. यावेळच्या निवडणुकीत मराठवाड्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. कारण या निवडणुकीआधी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या रुपात संपूर्ण मराठा मतदार एका छताखाली आणला आहे. मराठा समजाची भूमिका सोईची ठरल्यास सत्तेचं सिंहासन मिळवण्यास अडचणी येणार नाहीत. मात्र मनोज जरांगे यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. असे असताना जरांगे यांनी काल (19 ऑक्टोबर) मुस्लीम धर्मगुरुशी चर्चा केली आहे.

मनोज जरांगे पाटील आणि खलील-उर-रहमान सज्जाद नोमानी यांची छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये भेट झाली. सज्जाद नोमानी भारतीय इस्लामिक विद्वान आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे अशी आग्रही मागणी जरांगे पाटील यांची आहे. त्याचवेळी ते मुस्लीम आरक्षणाचा पण मुद्दा ऐरणीवर आणत आहेत. मराठा फॅक्टरला दलित आणि मुस्लीम समाजाची साथ मिळाल्याचे लोकसभेत दिसून आले. विधानसभेत जरांगे पाटील उभे ठाकले अथवा त्यांनी काही उमेदवारांना पाठिंबा दिला. तर त्यांच्या मागे हे तीनही समाज एकगठ्ठा उभा ठाकले तर राज्यातील चित्र बदलू शकते.

आता पडघम कशाचे आहेत हे सर्वांना माहित आहे गोरगरीबांच्या न्यायासाठी जनतेला एकत्र यावं लागणार आहे शेवटी शेतकरी अडचणीत सापडला आहे सामान्य जनता अडचणीत सापडले आहे तेव्हा आपण चर्चा केली पाहिजे जे वरिष्ठ आहेत जेष्ठ आहेत त्यांना अनेक वर्षांचा अनुभव आहे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे.

नोमानी हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत जेष्ठ आहेत त्यांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक वाटलं म्हणून मी त्यांचा मार्गदर्शन घेतलं, असं जरांगे पाटील म्हणाले. न्यायाच्या प्रतिक्षेत असलेला समाज जिथे मानवतावाद असतो तिथे जात लावून चालत नाही खेचून आणायचा आहे त्यामुळे मानवतावाद जागा ठेवणे महत्त्वाचा आहे नोमानी साहेब मोठे विचारवंत आहेत त्यांच्याशी चर्चा झाली त्यांचं प्रचंड मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे निवडणुकीत काहीही होऊ शकतं, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

ते प्रचंड आजारी आहेत त्यांना आंतरवाली मध्ये येता येत नव्हतं त्यांची धडपड होती मात्र त्यांना येता आलं नाही त्यामुळे मी इथपर्यंत आलो एक-दोन दिवस चर्चा होऊन पुढचा निर्णय होईल माणुसकीच्या नात्याने आम्ही भेट घेतली आहे त्यांना अन्यायाची चीड आहे समाजाचा आणि गोर गरीबांचा मान सन्मान वाढवणं गरजेचं आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments