सांगली, दि. 6 (प्रतिनिधी) – सांगली विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसच्या बंडखोर अपक्ष उमेदवार श्रीमती जयश्रीताई मदन पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊ. बिसूर गावातील जनता जयश्रीताईच्या पाठीशी आहे, असा विश्वास ग्रामस्थांसह कार्यकर्त्यांनी प्रचार बैठकी वेळी व्यक्त केला. अपक्ष महिला उमेदवार जयश्रीताई पाटील यांचा बिसूर गावात विविध ठिकाणी प्रचार दौरा संपन्न झाला. यावेळी त्यांनी गावातील महिला भगिनींशी संवाद साधला. महिलांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना जयश्रीताई पाटील म्हणाल्या, माझी उमेदवारी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आहे.यासाठी मला महिलांची साथ हवी आहे, काँग्रेस पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली नाही, मला मुद्दाम डावलण्यात आले, परंतु मी थांबले नाही, लोकांच्या मागणीमुळे मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला, गावातील जनता नेहमी वसंतदादा,मदनभाऊ, विशालदादाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीली आहे . तुम्ही माझ्या पाठीशी ही खंबीरपणे उभे राहा.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने जयश्रीताई पाटलांचा सत्कार करण्यात आला. मदन भाऊंच्या निधनानंतर जयश्री वहिनी पुन्हा खंबीर पने उंभ्या राहिल्या. एक महिला आमदार झाली पाहिजे, जयश्री ताईंना आपण आमदार म्हणून निवडून आणण्याची संधी दिली पाहिजे असा विश्वास उपस्थित महिलांनी व्यक्त केला.
यावेळी गावातील महिलांनी समस्यांचा पाढा वाचला, गावात सहा दिवसातून एकदाच पाण्याचा पुरवठा करण्यात येतो, गावासाठी स्वतंत्र घंटागाडी हवी, गावातील महिलांना रोजगार मिळायला हवा, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालयाची सोय व्हावी, बिसूर गावासाठी जादा बसेस सोडण्यात याव्यात. याप्रसंगी जयश्रीताईनी सर्व महिलांना या मागणीसाठी आश्वस्त केले.
यावेळी माजी सरपंच ललिता पाटील, माजी सरपंच आशा पाटील, पंचायत समिती माजी सभापती संपत भगत, माजी सरपंच व सोसायटी माजी चेअरमन शिवाजी पाटील, माजी सरपंच जयकर पाटील, माजी सोसायटी चेअरमन चंद्रकांत पाटील, माजी उपसरपंच सुनंदा पाटील, माजी सोसायटी चेअरमन बबन पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य विलासराव पाटील, माजी उपसरपंच बाळासो पाटील, गजानन पाटील, नितीन पाटील, अश्फाकभाई सय्यद, समीर मुजावर, जावेद मुजावर, जयसिंग पाटील,गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर जयसिंग पाटील, वसंत पाटील, सचिन पाटील, मंगल भगत, प्रणाली पाटील, सुभाष पाटील, अमोल हावळे, वसंत कुंभार, अनिल चौगुले यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.