सांगली, दि.6 – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते तानंग येथे विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून तानंगच्या जमदाडे वस्ती येथील बौद्ध विहार समोरील सभा मंडपाचे बांधकाम करण्याच्या कामाचा समावेश आहे. या कामाची अंदाजित किंमत रक्कम रुपये १५ लाख आहे.
यावेळी सरपंच सुनील पोतदार, अंकुश राजमाने, रावसाहेब चौगुले, बाबासाहेब चौगुले, अवधुत माळी, संजय ईरळे, बबन पाटील, संजय राजमाने व ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच यावेळी पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून तानंग ग्रामपंचायतीसमोर (गणेश मंदिर) सभामंडप बांधकामाचेही भूमिपूजन करण्यात आले. या कामाची अंदाजे किंमत रक्कम रुपये १२ लाख १४ हजार आहे. याबरोबरच ग्रामपंचायतीसमोर (विठ्ठल मंदिर) सभामंडप बांधकामाचेही भूमिपूजन करण्यात आले. या कामाची अंदाजे किंमत रक्कम रुपये १५ लाख आहे.