सांगली | प्रतिनिधी
पद्मभूषण स्व. डॉ. वसंतरावदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमीत्त वसंतदादा समाधीस्थळी, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना स्थळी, पी.व्ही.पी.आय. टी कॉलेज बुधगाव, तसेच सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे आदरांजली वाहण्यात आली.
प्रारंभी माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. प्रतिकदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे कमिटीचे उपाध्यक्ष तथा खासदार मा. विशालदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा, मा. श्रीमती शैलजाभाभी पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या उपाध्यक्षा मा. श्रीमती. जयश्रीवहिनी पाटील, सौ. पुजावहिनी पाटील यांचे हस्ते स्व. वसंतदादा पाटील यांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करणेत आले. व बाकीचे सर्व उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते सर्व उपस्थितांचे वतीने प्रा.डॉ. सिकंदर जमादार व मा. श्री. यशवंत हाप्पे यांनी मनोगतपर अभिवादन केले.
यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुजय शिंदे, संचालक शशिकांत नागे, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी महापौर किशोर शहा, नगरसेवक उत्तम साखळकर, संतोष पाटील, प्रकाश मुळके, मनोज सरगर, संजय कांबळे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे खजिनदार पी.एल.रजपूत सर, उदय पवार, आदिनाथ मगदूम, रघुनाथबापू पाटील, सांगली वसंतदादा शेतकरी साखर कारखाना व्हा. चेअरमन सुनिल आवटी, संचालक अमित पाटील, हर्षवर्धन पाटील, दौलतसिंह शिंदे, विशाल चौगुले, बी.डी. पाटील, सौ. सुमित्रा खोत, सौ. शोभा पाटील, विशाल चंदुरकर, दिनकर साळुंखे,वसंतदादा कारखाना कार्यकारी संचालक संजय पाटील, प्रदिप शिंदे, सुरेश पाटील, विष्णुअण्णा खरेदी विक्री संघ चेअरमन संग्राम पाटील, यशोवर्धन पाटील, कवठेमहंकाळ तालुका कॉंग्रेस अध्यक्ष संजयबापू हजारे, मिरज तालुका कॉंग्रेस अध्यक्ष आण्णासाहेब कोरे, धनाजी पाटील कोकळे, बळवंत यमगर, रावसाहेब शिंदे वाघोली, प्रा. दादासाहेब ढेरे, जे.के. बापू जाधव, उत्तम पवार, कुंडल, सांगली जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष संभाजी पाटील, गजानन साळुंखे, सुरेश निकम, अनिल केसरे,रमेश ताटे, वसंत सुतार, जिल्हा कॉंग्रेस सेवादलचे अध्यक्ष अजित ढोले, शहर जिल्हा कॉंग्रेस सेवादलचे अध्यक्ष पै. प्रकाश जगताप, विशालदादा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत (बंडू) पाटील, श्रीकांत पाटील, राजेश एडके, प्रदीप मगदूम, राजेंद्रप्रसाद जगदाळे, सुनिल गुळवणे, सुहास पाटील, जीवन लव्हाळे, नितीन खोत, मनोज सरगर, संदीप आडमुठे, अनुप पाटील, गजानन मिरजे, अभय कबुरे, महेश साळुंखे, लालसाब तांबोळी, प्रमोद इनामदार, विजय माळी, गंगाधर तोडकर,रोहन एडके, उदय बरगाले, भास्कर डुबल, दादासो पाटील, अमित पाचोरे, मयुर बांगर, विलास गावंड, स्वप्नील जाधव, धनराज सातपुते संजय कुलकर्णी, पंडीत पवार, श्रीहरी भस्मे, अविनाश शेटे, राहुल थोटे, शिवराज पाटील, रोहित कबाडे, युसुफ मिस्त्री, अमित बस्तवडे, श्रीमंत पांढरे, सुजित पवार, सुधीर कांबळे, जमीर पटाईत, पोपट पाटील, डॉ. उस्मान मुजावर, सर्व उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना स्थळी खासदार विशालदादा पाटील, सुनिल आवटी, संचालक अमित पाटील, गणपतराव सावंत, विशाल चंदुरकर, कार्यकारी संचालक संजय पाटील, प्रदीप शिंदे, मिलींद खाडीलकर, हेमंत कुरणे, अॅड. कुंभार, यांनी आदरांजली वाहिली. वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालय बुधगाव येथे वसंतदादा रजिस्टार संदीप उमराणी, जयसिंह रजपूत, प्रा. बाजीराव पाटील सर , आणि कर्मचारी वृंद, विद्यार्थी यांनी कॉलेज येथे आदरांजली वाहिली.
त्याचबरोबर सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथेही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकार महर्षी लोकनेते पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सरचिटणीस सुभाष तात्या खोत, वसंतदादा साखर कारखाना संचालक हर्षवर्धन पाटील, विशाल चौगुले यांच्या हस्ते स्व. दादांच्या प्रतिमेस पुष्पहार घातला व बाकीचे सर्व उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सचिन चव्हाण, कॉंग्रेस सेवादलाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अजित ढोले, कॉंग्रेस सेवादलाचे शहर जिल्हा अध्यक्ष पै. प्रकाश जगताप, पैगंबर शेख, मौलाली वंटमोरे, अरुण पळसुले, नामदेव पठाडे, सुनिल भिसे, शिवाजी सावंत, अल्लाबक्ष मुल्ला, भास्कर डुबल, भिमराव चौगुले, अमोल भिसे, विशाल पाटील, हनुमान साबळे, राजेंद्र कांबळे, सुरेश गायकवाड, शमशाद नायकवडी, विश्वास यादव, प्रकाश माने, प्रथमेश शेटे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मौलाली वंटमोरे व आभार अजित ढोले यांनी मानले.
पद्मभुषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथी निमत्त उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील व महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा. अॅड. राहुल नार्वेकर व जनसुराज्य पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समित कदम यांनी स्व. वसंतदादांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.