Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeराष्ट्रीयन्यायदेवतेच्या डोळ्याची पट्टी हटली; हातात तलवारीऐवजी आता संविधान

न्यायदेवतेच्या डोळ्याची पट्टी हटली; हातात तलवारीऐवजी आता संविधान

नवी दिल्ली – भारतीय न्यायव्यवस्थेने ब्रिटीशांचा काळ मागे टाकून नवे स्वरूप स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे केवळ चिन्हच बदलले नाही, तर न्यायदेवतेच्या वर्षानुवर्षे डोळ्यावर असलेली पट्टीही काढून टाकण्यात आली आहे. आता कायदा आंधळा नसल्याचा संदेश सर्वोच्च न्यायालयाने देशाला दिला आहे.

सुप्रीम कोर्टात डोळ्यावर पट्टी नसलेला लेडी ऑफ जस्टिसचा अर्थात न्यायदेवतेचा नवा पुतळा उभारण्यात आला आहे. आता तलवारीऐवजी संविधान न्यायदेवतेच्या पुतळ्याच्या हातात दिसत आहे. ब्रिटीश कायद्यात बदल करण्यात आल्यानंतर आता न्यायदेवतेच्या नव्या रुपातही काही बदल झाले आहेत.

न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढून देशात कायदा आंधळा नाही आणि तो शिक्षेचे प्रतीकही नाही असा संदेशच यानिमित्त देण्यात आला आहे. यासह तलवारीऐवजी आता न्यायादेवतेच्या हातात संविधान पुस्तिकेची जागा घेतली आहे.

न्यायदेवतेच्या पुतळ्याच्या डोळ्यावर पट्टी जी असते त्याचा अर्थ म्हणजे कायद्यासमोर सर्व समान आहेत आणि याचेच प्रतिनिधित्व करण्यासाठी ती होती, याचा अर्थ असा की न्यायालये समोर दिसणाऱ्या लोकांची संपत्ती, शक्ती किंवा स्थितीचे इतर चिन्हक पाहू शकत नाहीत, तर अधिकार आणि अन्यायाला शिक्षा देण्याची शक्ती दर्शवते.

प्राप्त माहितीनुसार, सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्या आदेशानुसार सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींच्या वाचनालयातील न्यायदेवतेच्या नवीन पुतळ्याचे डोळे उघडे ठेवण्यात आले आहेत. या न्यायदेवतेच्चा डाव्या हातात संविधानाच्या जागी तलवार आहे. इंग्रजाच्या काळातील वारसा मागे सोडण्याचा हा एक भाग असू शकतो. याआधीच इंग्रजांच्या काळातील फौजदारी कायद्याच्या जागी भारतीय न्याय संहिता लागू करण्यात आली आहे.

सरन्यायाधीशांच्या कार्यालयाशी संबंधित माहितीनुसार, न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा असा विश्वास आहे की, भारताने ब्रिटिश वारशातून पुढे जावे आणि कायदा कधीही आंधळा नसतो, तो सर्वांना समानतेने पाहतो. हा संदेश देण्यासाठी लेडी ऑफ जस्टिस अर्थात न्यायदेवतेच्या पुतळ्याच्या स्वरूप बदल केला आहे. पुतळ्याच्या हातात तलवार नसून राज्यघटना असली पाहिजे, जेणेकरून देशाला एक संदेश जाईल की ती न्याय देतात.

न्यायदेवतेच्या उजव्या हातातील न्यायाचा तराजू आहे. तो तसाच ठेवण्यात आला आहे, कारण तो समाजातील संतुलनाचे प्रतिनिधित्व करतो आणि निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी दोन्ही बाजूंच्या तथ्ये आणि युक्तिवादांचे न्यायालय सत्याच्या कसोटीवर वजन करतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments