सांगली (प्रतिनिधी) – जैन समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी महाराष्ट्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या जैन समाज अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून जैन समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व उपेक्षित लोकांना न्याय देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे जैन फाउंडेशन सांगलीच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. तसेच ललित गांधी यांनी जैन समाजाचे संघटन करून समाजाचे राष्ट्रीय व राज्य स्तरावरील अनेक प्रश्न पुढाकार घेऊन शासन दरबारी प्रभावीपणे मांडून जैन समाजाला न्याय दिला आहे.
ललित गांधी यांची प्रथम अध्यक्षपदी निवड करून राज्यमंत्री दर्जा दिल्याबद्दल जैन फाउंडेशन सांगलीच्या वतीने अण्णासाहेब पाटील, ऍड. उल्हास चिप्रे, विवेक जैन, भरत मगदूम, भरत निलाखे, देशभूषण पाटील, चेतन पाटील, अमोल पाटील, सुनील मानकापूरे, जयपाल कागे, महावीर तकडे, प्रशांत गौडाजे, शितल पाटील, सागर चौगुले, जिनेन्द्र पाटील, प्रफुल शेट्टी, शैलेंद्र पिराळे आदी पदाधिकाऱ्यानी ललित गांधी यांचे अभिनंदन करून शासन निर्णयाचे स्वागत केले आहे.