Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeसांगली जिल्हाजयश्री मदन पाटील यांच्या प्रचारार्थ पान असोसिएशनच्या वतीने भव्य पदयात्रा

जयश्री मदन पाटील यांच्या प्रचारार्थ पान असोसिएशनच्या वतीने भव्य पदयात्रा

 सांगली, दि.१४ (प्रतिनिधी) : अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने गुरुवार दि. 14 नोव्हेंबर 2024 रोजी भव्य पद‌यात्रा निघाली. आमराई उद्यानापासून सुरू झालेली पदयात्रा पटेल चौक, गणपती पेठ, सराफ कट्टा, कापड पेठ, दत्त मारूती रस्ता, मारुती चौक ते छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आयोजित करण्यात आली होती. या पद‌यात्रेत पान दुकानदार, गाळे धारक, खोकीधारक यांनी प्रचंड संख्येने सह‌भाग घेतला होता.

स्व.मदन भाऊ पाटील यांनी 1800 खोकीधारकांचे मुव्हेबल व पक्क्या गाळ्यामध्ये पूर्नवसन केल्यामुळे त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या उपजिविकचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला आहे. स्वर्गीय मदन भाऊंना आदरांजली म्हणून सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांना प्रचंड मताने निवडून देण्याचा निर्धार केला आहे. प्रचारादरम्यान घर तू घर जाऊन सर्वांनी जयश्री मदन पाटील यांच्या ‘हिरा’ या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या संख्येने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी व जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे यांनी केला. या पद‌यात्रेत मयूर बांगर, लालसाहेब तांबोळी, राजू पागे, विजय पाटील, राजू खोत, प्रकाश मोरे, सुरेश जाधव, सूजित शिंदे, मुन्ना शिरोळकर इत्यादी पदाधिकारी व छोटे गाळे धारक, खोकीधारक प्रचंड संख्येने सहभागी होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments