Monday, December 23, 2024
Google search engine
Homeसांगली जिल्हाजयश्रीताईंनंतर पृथ्वीराज पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून "सांगली पॅटर्न"चा एल्गार

जयश्रीताईंनंतर पृथ्वीराज पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून “सांगली पॅटर्न”चा एल्गार

दोन्ही गटातील कार्यकर्ते आक्रमक; कॉंग्रेसमध्ये बंडखोरी अटळ?

दोन्ही गटातील कार्यकर्ते आक्रमक; कॉंग्रेसमध्ये बंडखोरी अटळ?

सांगली, दि.24 (प्रतिनिधी) – जेमतेम 6 ते 7 महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील कॉंग्रेस एकसंध झालेली दिसत होती. जिल्ह्यातील दोन प्रमुख युवा नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी बजावली होती. परंतु ही एकसंधता काही काळापुरतीच होती की काय? असा सवाल सामान्य सांगलीकरांना पडला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या एकीचे विधानसभा निवडणुकीत विसर्जन करून कॉंग्रेसमधील श्रीमती जयश्रीताई पाटील आणि कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे दोन गट एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत.

 

जयश्रीताई पाटील यांच्या निवासस्थानी समर्थकांची बैठक पार पडली

सोमवारी (दि.21) जयश्रीताई पाटील यांच्या निवासस्थानी म्हणजेच विजय बंगल्यावर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जयश्रीताईंना विजयी करायचा निर्धार पक्का करण्यात आला. जयश्रीताई पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातून लढायचा निर्धार केला असून त्यांच्या विजयासाठी माजी मंत्री प्रतीक पाटील सक्रिय झाले आहेत. प्रतिक पाटील यांनी जयश्रीताईंच्या निवडणुकीचे नियोजन हाती घेतले असल्याची चर्चा आहे.

 

पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी समर्थकांची बैठक पार पडली

दरम्यान, मंगळवारी (दि.22) कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली असून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली नाही तर लोकसभेप्रमाणे बंडखोरी करून ‘सांगली पॅटर्न’ राबवू. स्वाभिमानी सांगलीकरांच्या साथीने निवडणूक लढवू, असा इशारा श्री. पाटील यांच्या समर्थकांनी बैठकीत दिला आहे.

पृथ्वीराज पाटील यांनी गेली दहा वर्ष संकट काळात पक्ष वाढवला आहे. गेली पाच वर्षे ताकदीने बांधणी केली आहे. सामान्य माणसापर्यंत पोहचून काँग्रेसच्या विचारांची मजबूत मोट बांधली आहे. कुणाच्या दबावामुळे त्यांना डावलण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला तर सांगलीकर जनता ते सहन करणार नाही. विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्यानंतर ज्या ताकदीने सांगलीकर त्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्याच ताकदीने पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी उभे राहतील. ज्याने पक्षासाठी संघर्ष केला, त्याला बंड करायची वेळ आणू नये, असा इशाराही यावेळी कार्यकर्त्यांनी दिला आहे.

सांगली विधानसभेत कॉंग्रेसच्या इछुक उमेदवारांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करून निवडणूक लढण्याचा निर्धार केला असल्याचे दिसून येते.

Cadeaus Corporation

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments