Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeराष्ट्रीयजम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये काँग्रेसचे पारडे जड

जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये काँग्रेसचे पारडे जड

कुणाची सत्ता येणार? काय सांगतो एक्झिट पोल?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल निकाल समोर आले आहेत. सर्व एक्झिट पोल दोन्ही राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवत आहेत. त्यांच्या मते काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळू शकतात. तर भाजपला 20-25 जागा मिळू शकतात. हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी शनिवारी एकाच टप्प्यात मतदान झाले. हरियाणात 2014 पासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे आणि मनोहर लाल खट्टर 2014 ते मार्च 2014 पर्यंत मुख्यमंत्री आहेत. सध्या नायब सिंग हे पद सांभाळत आहेत.

जम्मू-काश्मीरबद्दल बोलायचे झाले तर येथील निकालाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. याचे कारण म्हणजे येथे 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका झाल्या आहेत आणि दुसरे म्हणजे जम्मू-काश्मीरला सहा वर्षांनी मुख्यमंत्री मिळणार आहे. शेवटच्या मुख्यमंत्री पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती होत्या. त्यांनी 4 एप्रिल 2016 ते 19 जून 2018 पर्यंत मुख्यमंत्रीपद भूषवले होते. त्यानंतर येथे लेफ्टनंट जनरल हेच कारभार पाहतात.

जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांबद्दल लोकांमध्ये इतकी उत्सुकता असण्याचे आणखी एक कारण म्हणजे 2019 मध्ये कलम 370 आणि 35A हटवल्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाले. जम्मू-काश्मीर आणि हरियाणासाठी सर्व एक्झिट पोलचे निकाल काय सांगतात ते जाणून घेऊया,

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल:

मॅट्रिझ एक्झिट पोल

काँग्रेस+NC – 28-30

भाजप – 28-30

PDP- 05-07

OTH- 08-16

दैनिक भास्करचा एक्झिट पोल

काँग्रेस+NC – 35-40

भाजप – 20-25

PDP – 04-07

OTH – 12-16

Axis My India

काँग्रेस+NC – 35-4

भाजप – 24-34

PDP – 04-06

OTH – 08-23

इंडिया टुडे सी-व्होटर एक्झिट पोल

काँग्रेस+NC – 40-48

भाजप – 25-27

PDP – 06-12

OTH – 06-11

पीपल्स पल्स एक्झिट पोल

काँग्रेस+NC – 46-50

भाजप- 23-27

PDP-07-11

OTH-04-06

मॅट्रिक्स एक्झिट पोल

काँग्रेस+NC – 28-30

भाजप – 28-30

PDP -05-07

OTH -08-16

हरियाणा विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल:

मॅट्रिझ एक्झिट पोल

काँग्रेस – 55 -62

भाजप – 18-24

JJP -0-3

OTH -02 -05

दैनिक भास्करचा एक्झिट पोल

काँग्रेस – 44-54

भाजप – 15-29

INLD+ – 01-05

OTH – 06-09

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments