Monday, December 23, 2024
Google search engine
Homeसांगली जिल्हाकर्मवीर पतसंस्थेच्या माध्यमातून सामान्य माणसाची प्रतिमा उंचावण्याचे काम

कर्मवीर पतसंस्थेच्या माध्यमातून सामान्य माणसाची प्रतिमा उंचावण्याचे काम

कर्मवीर पतसंस्थेच्या QR Code बँकींग सेवेचा शुभारंभ खासदार विशालदादा पाटील

सांगली : सामान्य माणसांचा विश्वास प्राप्त करुन संचालक सेवक यांनी कर्मवीर पतसंस्थेचा विस्तार तळागाळापर्यंत केला आहे. सामान्य माणसाची प्रतिमा उंचावण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून होत असून आण्णांच कार्य संस्था पुढे चालवीत आहे. आधुनिक सेवेच्या माध्यमातून ग्राहकां ची गरज पुर्ण करुन संस्था जनहिताची कामे करीत असून यातून सर्वांना शिकण्यासारखं आहे. संस्थेची प्रगती खरोवरच अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन खासदार विशालदादा पाटील यांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित., सांगली च्या क्युआर कोड या आधुनिक बँकींग सुविधेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेव जिनगोंडा पाटील यांनी केले. अशी सेवा देणारी कर्मवीर पतसंस्था ही पहिली संस्था आहे असे त्यांनी सांगितले. त्यांनी संस्थेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा घेतला. ६४ शाखांमधुन कर्मवीर पतसंस्था सेवा देत आहे. संस्थेच्या ठेवी रु.११५५ कोटी असून रु. ८६२ कोटीचे कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेची गुंतवणुक रु. ३९८ कोटी आहे. संस्थेचे खेळते भांडवल रु. १३६० कोटी आहे. संस्थेचा स्वनिधी रु.११६ कोटी असून संस्थेचा एकूण व्यवसाय रु. २००० कोटीकडे वाटचाल करीत आहे. सभासद संख्या ६६००० आहे. नव्याने येणारी आधुनिक सेवा सभासदांना देण्यात कर्मवीर पतसंस्था अग्रेसर असते विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्थेने सदैव नाविण्याचा ध्यास घेतला असून सतत नव्याने आलेले तंत्रज्ञान संस्था आवर्जुन स्वीकारताना दिसते. त्यामुळे संस्थेची पाऊले नव्या काळाबरोबर पडत असल्याचे दिसते. संचालकां चे निर्णय आणि त्याला सेवकां च्या तत्परतेची साथ हे कर्मवीर पतसंस्थेचा नांवलौकीक वाढण्याचे कारण असल्याचे मला जाणवते असे खासदार विशालदादा पाटील म्हणाले.
यावेळी व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, संचालक डॉ. रमेश वसंतराव ढवू, श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, श्री. ओ. के. चौगुले (नाना) डॉ. एस. बी पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री. लालासाहेब भाऊसाहेब थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम, नेटविन सिस्टीम्स नाशिक चे असि. व्हाईस प्रेसिडेन्ट श्री. गणेश राऊत यांचे सह संस्थेचे सेवक उपस्थित होते. आभार संचालक अॅड. एस.पी. मगदुम यांनी मानले.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments