मुंबई – अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य विधानसभा उमेदवार आणि त्यांच्या मतदारसंघाची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये, अजित पवार हे बारामतीमधून उमेदवार आहेत. तर, नवाब मलिक यांनाही शिवाजीनगर मानखुर्दमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राजकीय संन्यास घेणार असल्याचे सांगणारे आमदार प्रदीप सोळुके यांच्या माजलगाव मतदारसंघात त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांचे नाव समोर आले आहेत. त्यामुळे, यंदा माजलगाव मतदारसंघातून जयसिंह सोळंके हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार असतील.