Monday, July 7, 2025
Google search engine
Homeक्राईमस्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री अटक, असा सापडला तावडीत

स्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री अटक, असा सापडला तावडीत

पुणे (वृत्तसंस्था) – पुणे पोलिसांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर दत्तात्रय गाडेला पुण्यात आणण्यात आले आहे. दत्तात्रय गाडे याने मंगळवारी पहाटे 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता. ही धक्कादायक घटना स्वारगेट बसस्थानकात घडली होती.

पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी 100 पोलिसांचा ताफा, डॉग स्कॉड गुनाट गावात दाखल झाले होते. दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पोलिसांनी 13 पथके तयार केली होती. पुणे पोलिसांनी गाडे याला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पकडण्यात आले आहे. उसाच्या शेतात लपून बसलेल्या दत्तात्रय गाडीच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांना आरोपी सापडला आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे.

पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी आरोपी ताब्यात असून पुढील तपासासाठी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिले. गेल्या तीन दिवसांपासून तो गुनाटमध्ये होता असे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. गुनाटच्या गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला मदत केली आहे. गावाच्या एका भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले अशी माहिती निखिल पिंगळे यांनी दिली. झोन 2, क्राईमच्या टीम, ड्रोनची पथकं, आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस पथकं होती. गावकऱ्यांनी मोठं सहकार्य केलं आहे, असेही निखिल पिंगळे म्हणाले.

शिरूर तालुक्यातील गुणाट या गावांमध्ये रात्री दीडच्या सुमारास पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु असताना दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली आहे. Dog squad च्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत होते.

दत्तात्राय गाडे बाराच्या सुमारास याच गावातील त्याच्या नातेवाईकांच्या घरी पाण्याची बाटली मागण्यासाठी गेला होता. पाण्याची बाटली घेतल्यानंतर त्याने जे काही मी केलं त्याचा मला पश्चाताप झाला आहे, असे दत्तात्रय गाडे म्हटल्याची माहिती आहे. मला पोलिसांना सरेंडर व्हायचं आहे असा बोलून परत निघून गेला होता.

दत्तात्रय गाडे पाणी घेऊन गेल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली. गाडे याच्या अटकेमध्ये गुनाट गावातील पोलीस पाटील आणि ग्रामस्थ यांचं मोठं सहकार्य पोलिसांना लाभलं. गाडे याला पोलिसांनी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिलं असून या संदर्भात पुढील तपास त्यांच्याकडून करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments