मुंबई – बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
धनंजय देशमुख हे मस्साजोगच्या ग्रामस्थांसह अन्न त्याग आंदोलनाला बसले आहे. आजचा त्यांचा आंदोलनाचा दुसरा दिववस आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 78 जिवस पूर्ण होऊन न्याय मिळाला नाही. या न्यायासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनातील एक मागणी सरकारने मान्य केली आहे.
उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली ही समाधानाची बाब, मात्र आंदोलन केल्या नंतरच सरकार मागण्या मान्य करतय अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिली आहे. उज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर धनंजय देशमुख यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे.
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. पोलीस अधीक्षक कॉवत यांनी धनंजय देशमुख यांना आंदोलन स्थगित करण्याची फोनवर विनंती केली आहे.
या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग उत्स्फूर्त आहे .बीडचे खासदार बजरंग सोनवणे आज या आंदोलनाला भेट देणार आहेत .सरकारने आज जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर उद्यापासून आंदोलक पाणी देखील त्यागणार आहेत .त्यामुळे शासनाच्या वतीने आज आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी कोणी मसाजोग मध्ये चर्चेसाठी येते का हे पहाव लागणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 78 दिवस पूर्ण झाले असून अद्याप पर्यंत ही यातील कृष्णा आंधळे हा आरोपी फरारच आहे.