Monday, July 7, 2025
Google search engine
Homeप्रादेशिकशाळेत सीसीटीव्ही बसविण्यासाठी स्वतंत्र अनुदान मिळावे

शाळेत सीसीटीव्ही बसविण्यासाठी स्वतंत्र अनुदान मिळावे

सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांची मागणी

सांगली, दि.31 (प्रतिनिधी) – शासनाच्या २१ ऑगस्ट २०२४ रोजी च्या परिपत्रकानुसार प्रत्येक शाळेत सी. सी. टीव्ही. कॅमेरे बसविणे बंधनकारक केले आहे. मागील काही दविसापासून शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सोबत अनुचित प्रकार घडल्याचे समोर आलेले आहे. सबंधित शाळांमध्ये विकृत मानासिकत्याच्या कर्मचाऱ्यांनी मुलींची छेडछाड करून त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व गोष्टी शैक्षणिक विभागाला काळिमा फासणारे आहेत. प्रत्येक शाळेत सी. सी टी. व्ही. कॅमेरे बसवल्यास अशा गैरप्रकारांना व वाईट कृत्यांना आळा बसेल अशी अपेक्षा ठेवून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.

सरकारच्या दृष्टिकोणातून घेतलेला हा स्तुत्य असला तरी शिक्षण संस्थांच्या दृष्टिकोणातून हा निर्णय खर्चिक आहे. ज्या शक्षणिक संस्थांचे आर्थिक परिस्थिती चांगली आहे. अशा संस्थांनी शाळांच्या परिसरात सी.सी.टीव्ही. कॅमेर बसवून अनधिकृत व्यक्तीच्या प्रवेशाला पायबंद घातलेला आहे. पण २०२५ वर्षात सुरु होणाऱ्या दहावी व बारावीच्या परिक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात सी. सी. टीव्ही. कॅमेरे बसवावळे लागणार आहेत. एखाद्या परीक्षा केंद्रावर अधिक विद्यार्थ्यांचे नंबर आलले असतील तर त्या संस्थेच्या प्रत्येक वर्गात कॅमेरे बसवावे लागणार आहेत. म्हणजेच त्यांच्याही खर्चावर अधिक ताण येणार आहे.

ज्या शिक्षण सम्या टप्पा अनुदानित आहेत किंवा ज्याची कनिष्ठ महाविद्यालये टप्पा अनुदानाया यादीत आहोत अशा संस्थांना हा खर्च करणे अवघड झालेले आहे. ज्या संस्था अनुदानित आहेत त्यांना फक्त ५% वेतनेत्तर अनुदान मिळते. हे वेतनेत्तर अनदान घरपट्टी, पाणी वीज व मालमत्तेची दुरुस्ती यावरच खर्च होतो. त्यामुळे असहा संस्था सी. सी. टीव्ही. कॅमेरे बसवण्यास तयार नाहीत. जर त्यांना स्वतंत्र अनुदान मिळाले तर, स्वखुशीने या संस्था तयार होतील म्हणून सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे श्री. विनोद पाटोळ परा. शिवपुत्र अरबोळे, श्री. आर. एस. चोपडे, श्री. नितीन खाडीलकर, श्री. अरुण दांडेकर, श्री. शशिकांत राजोबा, श्री. शिवपुत्र अरबोळे, श्री. एस. के. होर्तीकर, श्री. वैभव गुरव यांनी हि माहिती दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments