छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीने आपल्या 10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात औरंगाबाद मध्यमधून मोहम्मद जावेद मोहम्मद इसहाक यांना संधी देण्यात आली आहे. तर गंगापूरमधून सय्यद गुलाम नबी सय्यद यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने 11 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात औरंगाबाद पूर्वचा उमेदवार जाहीर केला होता. यानंतर आता मलकापूर, बाळापूर, परभणी, औरंगाबाद मध्य, कल्याण पश्चिम, हडपसर, माण, शिरोळ, सांगली या जागांचा समावेश आहे. वंचितने यावेळी जाहीर केलेले सर्व 10 उमेदवार मुस्लिम समाजातील आहेत. त्यामुळे एकूण घोषित उमेदवारांची संख्या 21 वर पोहोचली आहे.