सांगली (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा सक्रीय सदस्यता नोंदणी शुभारंभ सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला.
भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्राथमिक सदस्यता नोंदणीचे लक्ष्य १,२४,४०० देण्यात आले होते. भाजपा कार्यकर्त्यांनी यासाठी गेले दोन महिने नोंदणी अभियान राबविले होते. प्रत्येक घरी संपर्क साधून कार्यकर्त्यांनी यासाठी गेले दोन महिने नोदणी अभियान राबविले होते. प्रत्येक घरी संपर्क साधून कार्यकर्त्यांनी हे लक्ष पूर्ण केले व १,२५,२६९ नोंदणी पूर्ण करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यानंतर आता भाजपाची ” सक्रीय सदस्यता नोंदणी” सुरु करण्यात आली आहे. ज्या कार्यकर्त्यांचे किमान ५० सदस्य नोंदणी केली आहे. अशा सदस्यांना ” सक्रीय सदस्य ” करून देण्यात येत आहे.
मंगळवार दि. २५ रोजी सकाळी ११.०० वाजता या नोंदणी अभियानास प्रारंभ झाला. सांगलीचे आमदार मा. सुधीरदादा गाडगीळ व मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचे सक्रियता सदस्य स्वीकृत करण्यात आले. त्यांचेसह जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वीकृत सदस्य नोंदणी अर्ज स्वीकारण्यात आले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, शहर जिल्हा सरचिटणीस व सक्रीय सदस्यता नोंदणी संयोजक मोहन वाटवे, नोंदणी अभियान समिती सदस्य विशाल पवार सह संयोजक व जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, जिल्हा सरचिटणीस गीताताई पवार, जिल्हा सरचिटणीस राजू आवटी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश मोहिते, मिलिंद भिडे, महेंद्र पाटील, जयवंत पाटील यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.