सांगली (प्रतिनिधी) – वृद्धांनी आपलं आयुष्यभर मिळवलेलं पैशाचं गाठोडं जपून ठेवाव आणि सन्मानाने जगावं असे प्रतिपादन कर्मवीर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केले. बिझनेस एक्सप्रेस आणि श्री फौंडेशन यांच्यावतीने ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या १०० व्यक्तींचा रोटरी हॉलमध्ये झालेल्या एका खास समारंभात सन्मान करण्यात आला. या सत्काराने हे वृद्ध आणि त्यांचा परिवार भारावून गेला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया व महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे सदस्य विजय पाटील हे उपस्थित होते.
भारतीय औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष तसेच बिझनेस एक्सप्रेस श्री फौंडेशनचे विश्वस्त सल्लागार जगन्नाथराव (आप्पा) शिंदे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी पितांबरी प्रोडक्ट्स प्रा. लि. ठाणे, पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्स, सांगली, मानसिंग को. ऑप. बँक, दुधोंडी, कर्मवीर नागरी सहकारी पतसंस्था, सांगली , दोड्डण्णावर ब्रदर्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, बेळगाव यांचे विशेष सहकार्य लाभले. मान्यवरांचा सत्कार बिझनेस एक्सप्रेस श्री फौंडेशनचे संपादक ए.आय. मुजावर यांनी केला.
यावेळी रावसाहेब पाटील म्हणाले वयवर्षे 75 पूर्ण झालेले अशा व्यक्तींनाआजच्या जगात कोणी विचारत नाही पण अशा व्यक्तींचा यथोचित सन्मान , सत्कार करून या विचारसरणीला मुजावर साहेबांनी खंड पडला. आर्थिक सल्ला असा दिला की .तुमचं गाठोड आत्ताच मुलांना देऊ नका. नंतर ते त्यांचेच आहे. पण तुमचंआयुष्य चांगलं जगायचं असेल तर तुमचा पैसा जपून ठेवा. महिन्याला तुमचा औषधांसह एकूण खर्च 25 हजार येत असेल तर किंमत 50 हजारापर्यंत चे रक्कम तुमच्या अकाउंट वर शिल्लक पाहिजे. समाधान जीवनासाठी आर्थिक पाठबळ हवा आहे. आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेवले पाहिजे. मुजावर साहेबांनी शंभर व्यक्तींच्या सत्काराचा एक उत्कृष्ट उपक्रम राबवला. या वयातील व्यक्तीने समवयस्क व्यक्तींमध्ये रमलं पाहिजे त्यातच त्यांना आनंद, आधार आणि प्रेम मिळते.
प्रमुख अतिथी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया व महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे सदस्य श्री. विजय पाटील म्हणाले आजचा हा सत्कार समारंभ खूप आगळा वेगळा आहे. मा.आ. जगन्नाथराव शिंदे म्हणजेच आप्पांची उपस्थिती नसताना देखील समाजातील विविध गुणांनी अंगीकारलेल्या अनेक व्यक्तीमत्त्वांना वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक स्तरातून एकत्र आणणे आणि त्यांचा उचित सत्कार, सन्मान करणे हा खूप मोठा कार्यक्रम मुजावर साहेबांनी केलेला आहे. वयाची 75 वर्षे पूर्ण पण कार्याला विराम नसलेले व्यक्तिमत्व म्हणजे आप्पा! हजारो व्यवसायिकांचे आयुष्य उजळवणारे अप्पा! हृदय प्रत्यारोपण साठी हजारो लोकांना केलेले आर्थिक सहकार्य,महापुरामध्ये सांगलीतील जवळजवळ 141 केमिस्ट तर कोल्हापूरचे 130 केमिस्ट आणि राज्यातील अनगिनत व्यवसायिकांना मदत केली. सर्व गरजूंना एकूण साडेसहा कोटींची मदत देण्यात आली. सर्वसामान्य लोकांची सेवा करणे, करोना काळात अतिशय दुर्गम भागात ही विना व्यत्यय औषध पोहोचण्याचे काम आप्पांच्यामुळे शक्य झाले. आप्पांच्या 100 व्या वाढदिवसा वेळीही हीच माणसे पुन्हा या ठिकाणी एकत्र यावेत अशी मी विनंती करतो. बिझनेस एक्सप्रेसचे संपादक, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक मुजावर साहेबांचे विशेष कौतुक केले. त्यांच्या पुरस्कारा साठी निवडले गेलेले सत्कारमूर्तींचे कार्य खरोखरच गौरवास्पद असतात.
यावेळी डॉ. अजित पाटील म्हणाले वृद्धांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. आयुष्य हे खूप मोलाचे आहे ते सांभाळले पाहिजे. यावेळी कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव, रेंदाळ किरणा व्यापारी संघाचे दत्ता पाटील यांची भाषणे झाली.
बिझनेस एक्सप्रेस श्री फौंडेशनचे ए. आय. मुजावर, पत्रकार शशिकांत कुंभोजकर, राजेंद्र पवार , आर. जी. इनामदार, जे. वाय. पाटील, आप्पासाहेब पाटील, अनिल आपटे, मनीषा धारवाडकर, ऋतुजा चव्हाण आम्ही उद्योजिका मासिकाच्या कार्यकारी संपादिका सुवर्णा बेळगी, सुमन कल्याणकर, मनमंदिर बँकेच्या सीमा खंडागळे यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले. प्रास्ताविक बापू जाधव यांनी, सूत्रसंचालन जस्मिन शेख यांनी तर आभार वैष्णवी जाधव यांनी मानले.