Monday, July 7, 2025
Google search engine
Homeसांगली जिल्हाकेंब्रिज इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

केंब्रिज इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मिरज, दि.20 (प्रतिनिधी) – केंब्रिज इंटरनॅशनल सी बी एस ई स्कूल चे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनात इयत्ता पहिली ते दहावी च्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य रंगमंचावर सादर करून सर्व पालकांचे मने जिंकले. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संकल्पनेवर आपले ग्रुप इव्हेंट्स सादर करून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला.

तसेच या स्नेहसंमेलनात रंगमंचावर मराठी भाषेतून नाटक सादर करण्यात आले या नाटकातून सर्वधर्मसमभावाचा संदेश सर्वांना दिला. तसेच तसे इंग्रजी भाषेतून सुद्धा एक नाटिका सादर करण्यात आली त्यातून सुद्धा मौल्यवान संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील सर, संस्थेचे ट्रस्टी वीरेंद्रसिंह पाटील, संस्थेचे कॅम्पस समन्वयक सतीश पाटील सर, शाळेचे प्रशासक रफिक तांबोळी सर, उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर मॅडम, समन्वयिका अश्विनी येलकर मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या स्नेहसंमेलनाचे स्वागत व प्रास्ताविक समन्वयिका अश्विनी येलकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख समन्वयिका वंदना डोंगरे यांनी केले. शाळेचे वार्षिक अहवाल वाचन उपमुख्याध्यापिका सौ पद्मा सासनूर यांनी केले.

 या प्रसंगी पाहुणे आपल्या मनोगतच म्हणाले की, “सर्व भाषा जीवनामध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असतात. मराठी भाषा असो, किंवा इंग्रजी भाषा, या सर्व भाषा जीवनामध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असतात. आता इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा झाली असून या भाषेचेही महत्व खूप आहे. म्हणून इंग्रजी भाषा शिकणे ही काळाची गरज आहे.”

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन पृथ्वीराज पाटील म्हणाले की, शाळेतून मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो. मुलांच्या जीवनामध्ये प्रत्येक भाषेचे महत्व खूप आहे.म्हणून सर्व भाषा शिकणे ही सध्याची गरज आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अरणी सासनूर,समृद्धी पाटील, तसेच विद्यार्थी आयुष जाधव, जेसन सावनुर, परिधी वांदे, ऑलिव्ह मंडा केले. कार्यक्रमाचे आभार प्रशासक रफिक तांबोळी सर यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments